narendra modi make in inda

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने देशात सुरू केलेल्या मेक इन इंडीया या उपक्रमातून भारतीय उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळत असून निवडणुक झाल्यानंतर २०० आघाडीच्या अमेरिकन कंपन्या आपलं उत्पादन भारतात हलवण्याच्या तयारीत आहेत. या कंपन्यांचा बेस सध्या चीनमध्ये असून सध्या भारतातील स्थिती उत्पादन क्षेत्रासाठी अनुकूल असल्याने त्यांचे प्रकल्प भारतात हलवण्यासाठी ते उत्सुक आहेत. या सगळ्या कंपन्या भारतात आल्यास भारतात प्रचंड प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे.

गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून चीनने जाणीवपूर्वक जगाचे मॅन्युफॅक्चरींग हब होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. सध्या चीनमध्ये उत्पादन क्षेत्रासाठी एक मोठी इकोसिस्टम आहे. असे असले तरी चीनचा आंतरराष्ट्रीय राजकारणात झालेला उदय जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला मान्य नाही. पाश्चात्य जगात वापरल्या जाणा-या वस्तू मोठ्या प्रमाणावर चीनमध्ये उत्पादन प्रकल्प असलेल्या अमेरिकन कंपन्यांकडून खरेदी केला जात होता. त्याशिवाय चीनच्या स्थानिक कंपन्याही या इकोसिस्टमचा फायदा घेऊन मोठ्या झाल्या आहेत.

मोठ्या प्रमाणावर चीनमधून आयात होत असल्याने अमेरिकेची चीनसोबतची व्यापारी तूट वाढत चालली होती. हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस अमेरिका चीनची आर्थिक गुलाम होईल अशी भिती व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबतची व्यापारी तूट भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या. त्याचाच भाग म्हणून चीनमधून येणा-या मालावर मोठ्याप्रमाणावर आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेऊन चीनबरोबर व्यापार युद्ध छेडले.

या व्यापार युद्धामुळे चीनची निर्यात मोठ्या प्रमाणावर कमी झाली. या परिस्थितीत कोंडी झालेल्या अमेरिकन कंपन्या आपले उत्पादन इतरत्र हलवण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. मोदी सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडिया उपक्रमामुळे भारत हा या कंपन्यांसाठी एक सक्षम पर्याय म्हणून पुढे आला. त्याचेच प्रतिबिंब य़ुएस इंडिया स्ट्रॅटेजिक ऍंन्ड पार्टनरशीप फोरमच्या ताज्या अहवालात पडले आहे. या फोरमचे अध्यक्ष मुकेश अघी म्हणतात की, आमची या कंपन्याशी भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी बोलणी सुरू आहेत. चीन मधून बाहेर पडण्यासाठी या कंपन्या प्रयत्नशील आहेत.या कंपन्यां लवकर भारतात याव्यात यासाठी भारत सरकारने निर्णय प्रक्रिया वेगवान करून काही आर्थिक सुधारणा करण्याची गरज आहे. कारण गेल्या १८-२० महिन्यात घेतलेले काही निर्णय देशांतर्गत उद्योगांना उपयुक्त असले तरी जागतिक उत्पादन उद्योगासाठी ते उपयुक्त नाहीत. त्यामुळे सरकारने तातडीने त्यासाठी काही पावले उचलली पाहिजेत. अघी यांच्या मतानुसार, भारताला ग्लोबल सप्लाय चेनचा भाग होण्यासाठी कस्टम देशांतर्गत जमिन अधिग्रहणाचे कायदे, कस्टम विषयक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले पाहिजेत. तरच या कंपन्या भारतात गुंतवणूक करून आपले उत्पादन सुरू करु शकतील. भारत आणि अमेरिकेमध्ये मुक्त व्यापार करार करण्याची आता वेळ आली आहे असे अघी म्हणाले.

युएस इंडिया स्ट्रैटेजिक ऍन्ड पार्टनरशीप फोरमच्या अंतर्गत उच्चस्तरीय मॅन्युफॅक्चरींग कौन्सिलची स्थापणा करण्यात आली आहे. या कंपन्यांना भारतात आपले प्लान्ट सुरू करण्यासाठी सरकारने तातडीने कोणती पावले उचलावित यासाठी आम्ही आमच्या शिफारसी तयार ठेवणार आहोत. निवडणुकीनंतर तातडीने या शिफारशी सरकारला सादर करण्यात य़ेतील असं अघी यांनी सांगितलं.

भारतात उत्पादन क्षेत्राला चालना देणारी बॅकअप स्ट्रॅटजी तयार करणे गरजेचे आहे. भारतात येण्यास आतूर असलेल्या कंपन्या मोठ्या असून त्या मोठी गुंतवणुक आणतील. या कंपन्या मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करतील. आमच्या सदस्य कंपन्या आता फक्त निवडणुका संपण्याची वाट पाहत आहेत एकदा निवडणुक संपली की या दिशेने वेगाने हालचाली सुरू होतील.

माहिती स्रोत : About 200 US firms aim to move manufacturing base from China to India post-general election: USISPF

लेखांच्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा : फेसबुक / ट्विटर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here