prakash ambedkar rationalperusal

प्रिय बाळासाहेब आंबेडकर यांसी सप्रेम जयभीम

साहेब, लोकसभा निवडणुकीतील उत्तुंग यशाबद्दल सर्वप्रथम मनापासून अभिनंदन

लोकांना जिंकून आलेल्या डोक्यानुसार यश मोजायची सवय आहे. ती जाऊ द्या. कारण ४२ लाखांच्या आसपास वंचीत आघाडीने मतदान प्राप्त केल आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर सम्पूर्ण देशात मोदी यांच्या विजयानंतर कोणती चर्चा असेल तर फक्त वंचीत आघाडीचीच आहे.

डॉ आंबेडकर यांना पाडणारा पक्ष म्हणून, तसेच डॉ आंबेडकर यांची केंद्रीय मंत्री मंडळात कोंडी करणारा पक्ष म्हणून काँग्रेस तुमच्या डोक्यात होतीच. नंतरही काँग्रेसचा इतिहास हा दलितांना दाबुन टाकणाराच होता. त्याचा किमान ३ वेळा अनुभव तुम्ही स्वतः घेतला आहे.

यावेळी मात्र तुम्ही हाजी मस्तान – प्रा जोगेंद्र कवाडे यांनी एकदा केलेल्या प्रयोगाची अभ्यासपूर्वक उजळणी करून जो डाव मांडला त्याला तोड नाही.

आज महाराष्ट्र राज्यात भाजप सेना राष्ट्रवादी काँग्रेस ही प्रमुख विभागणी आहे. यात स्वतः साठी जागा निर्माण करण्यासाठी यातील एक दोन पक्ष रसातळाला जायला हवेत. भाजप, सेना, राष्ट्रवादी हे तकलादू पक्ष नव्हेत.

मग राहिला पक्ष काँग्रेस. काँग्रेसची सध्याची परिस्थिती व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या पेशंट सारखी आणि उपचार करणारा डॉक्टर राहुल सारखा…! मग ही सुवर्णसंधी हेरून साधणे यासाठी तुमच्या सारखा माणूस सुयोग्य ठरला…!

२० लाखांच्या मतदारसंघात वंचीत उमेदवार निवडून येणे अवघड. पण तो उमेदवार दुसर्यांना पाडू शकतो हे ओळखून तुम्ही काँग्रेस बरोब्बर झोपवलीत!

यातून कार्यकर्त्यांना प्रबळ असा आत्मविश्वास तुम्ही दिलात…!

आणि नाहीतरी तुमचे लक्ष लोकसभा नव्हतेच – तुमचे लक्ष विधानसभा आहे…!

विधानसभा मतदारसंघ हा ४० ते ५० हजार मते असा खेळ असतो.

आज कॉन्ग्रेसची विश्वासार्हता, त्यांचा आत्मविश्वास घालवून तुम्ही स्वतःसाठी उत्तम अशी खेळपट्टी तयार केलीत. आज राष्ट्रवादी सारखा पक्ष गलितगात्र झालाय. त्यांच्या जहाजातून कुणी प्रवास करायला नको म्हणत आहे. त्यात काँग्रेस राष्ट्रवादी मनसे स्वाभिमानी अशी खिचडी होणार. त्यात उमेदवारी मिळण्याची मारामारी होणार. तसाच काहीसा प्रकार भाजप सेनेत होणार आहे. यातील ज्यांना उमेदवारी मिळणार नाही असे मातब्बर तुम्ही वंचीत आघाडीत आता स्वतः च्या terms व conditions वर आणण्याची ताकद तुम्ही नक्की कमावली आहे…!

विविध जाती घटक तुम्ही २८८ मतदारसंघात व्यवस्थित irrigation करून बसवू शकता. धनगर मुस्लिम आजच तुमच्या वर फिदा आहेत. त्यात मराठा समाज नेहमीसारखा विस्कळित आहेच. त्यांचा विस्कळीतपणा तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो.

संभाजी ब्रिगेड मराठा मोर्चा संयोजक समन्वयक यांच्या राजकीय आकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. त्यातील मातब्बर वंचीत आघाडीत येऊ शकतात. अशी विविध जाती घटक थेंबे थेंबे जमवून तुम्ही किमान २५ ते ५० आमदार नक्कीच आणू शकता…!

मुस्लिम समाज लोकसभेला जरा साशंक होता. त्यांची मते संपूर्णपणे वंचीत कडे आली नाहीत. कारण विश्वास नव्हता त्यांचा तुमच्यावर. कारण काही मते पारंपरिक काँग्रेसी राष्ट्रवादी होती, ती त्यांच्या कडे गेली.

पण…

२३ मे नंतरची काँग्रेस राष्ट्रवादी यांची फरपट,ससेहोलपट, भाजप सेनेने काढलेली पिसे बघून तो पारंपरिक मतदार वंचीत कडे नक्कीच वळू शकतो. कारण त्यांना आता पर्याय तुमच्यात दिसेल.

त्यात औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांच्या विजयात बौद्ध समाजाने जे झोकून प्रामाणिक काम केलं त्याचा परिणाम पारंपरिक मुस्लिम मतांना वंचीत कडे वळवण्यात यश देऊ शकतो.

पण एक धोका आहे…!

मुस्लिम माथेफिरू भडक लोकांनी व्हिडीओ दाखवायला सुरुवात केलीय. त्यातून हिंदू ध्रुवीकरण व्हायला सुरुवात झालीय. त्या भडक वक्तव्यामुळे “मुस्लिम अनुनय करणारे” असा शिक्का बसून तुमच्या बद्दल नको ते प्रवाद पसरवले जाण्याची दाट शक्यता आहे. त्याचा परिणाम मतांवर होऊ शकतो.

या मुस्लिम आक्रमक वक्तव्यावर आवर घातला तर महाराष्ट्र राज्यातील प्रबळ विरोधीपक्ष म्हणून वंचीत आघाडी उभी राहील.

काँग्रेसी लोक आता तुमच्या दारात कटोरा घेऊन उभे राहतील. त्यांना थारा देवु नका. त्यांचे हात दगडाखाली आहेत म्हणून ते तुमच्या दारात आहेत. पण ते वंचीत बरोबर आघाडी करून स्वतःला वाचवायला बघत आहेत. त्यांची स्पेस तुम्ही व्यापली आहे…त्यांना पुन्हा डोके वर काढू देऊ नका…! त्यांच्याशी युती करणे म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं होईल.

राजकिय आलेखात काँग्रेस जेवढी खाली जाईल तेवढी वर वंचीत आघाडी वर येणार आहे. यापुढील सर्व राजकीय व्यूहरचना करताना या एका गोष्टीला कायम लक्षात असू द्या!

जय भीम!

आपलाच चाहता,
डॉ निल वाघमारे

फिचर्ड इमेज स्रोत : newslaundry.com

लेखांच्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा : फेसबुक / ट्विटर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here