Home Authors Posts by Rajesh Kulkarni

Rajesh Kulkarni

7 POSTS 0 COMMENTS

टिंगलखोरांना पुढील पाच वर्षांसाठी शुभेच्छा…!

गेली पाच वर्षे तुम्ही देशाच्या पंतप्रधानांची दरवाजातल्या पायपुसण्याचीही इज्जत ठेवलेली नाही. इतके तुम्ही मोदीद्वेषात अाकंठ बुडून गेलात. तरीही हा गावंढळ व अतिसामान्य माणूस त्याला जे करायचे त्या मार्गावर चालतच राहिला. भुंकणार्‍या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करत निश्चयीपणे चाललेल्या हत्तीप्रमाणे.

अँटी सॅटेलाईट मिसाईल ते “आधार”: काँग्रेस व भाजपमधील हिम्मत व इच्छाशक्तीतील...

एकूण काय दिसते? तर प्रत्येक गोष्टीमध्ये आधी राजकीय इच्छाशक्तीचा संपूर्ण अभाव. आणि आता मात्र या व अशा प्रत्येक गोष्टीतील राजकीय इच्छाशक्ती.

गावस्कर-तेंडूलकर यांच्यावरील टीका – क्रिकेटप्रेमींचा बेजबाबदारपणा व सर्वसमावेशक भुमिकेचा अभाव

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने जरूर खेळावे. त्या सामन्याकडे प्रेक्षकांनीही कोंबड्यांच्या झुंजीसारखे पाहू नये. स्पर्धेवरच बहिष्कार घालायचा तर तेही ठीक; मात्र मग पाकिस्तान सहभागी होणार्‍या प्रत्येक स्पर्धेबाबत तसेच करणार का हेही आधीच ठरवा. अन्यथा या प्रासंगिक प्रतिक्रियेला अर्थ राहणार नाही.

अर्थसंकल्पातील ‘शेतकर्‍यांना फक्त सहा हजार?’ मागचे वास्तव

पाच एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकरी कुटुंबाला वर्षाला (फक्त) पाच हजार रूपये म्हणजे दर महिन्याला (फक्त) पाचशे रूपये देणार? यावरून अनेकांना शेतकर्‍यांचा...

मोदींना पर्याय कोण, हा प्रश्न नव्हे – मोदींना पर्याय नक्की कोणाला...

विरोधक आणि विरोधकांना सामील माध्यमे हा प्रश्न लावून धरतील, हे उघड असले तरी त्यांचा पुर्वेतिहास पाहता आणि अशा अस्थिर सरकारांमुळे आजवर झालेले देशाचे अपरिमित नुकसान पाहता पुन्हा त्या मार्गाने जाणे नाही.

अशोक चक्राचे मानकरी व देशासाठी सर्वोच्च बलिदान करणार्‍या लान्स नायक नाझिर...

म्हटले तर नाझीर, मन्नन आणि बुर्‍हान हे तिघेही वाईट संगतीला लागले होते. वेगवेगळ्या अन्यायाचे निमित्त करून हातात बंदूक घेणे अजिबात कठीण नाही. मात्र नाझीरने वेळेत स्वत:चा विचार केला. की काश्मीरला अशांत ठेवण्यास भारतीय लष्कर जबाबदार आहे की पाकिस्तान, फुटीरतावादी काश्मिरी नेते अाणि काश्मीरला केन्द्राकडून मिळणार्‍या मदतीचा अपहार करत व पाकिस्तानकडून अापल्या जीवाची हमी घेत उसने आयुष्य जगणारे खाल्ल्या घराचे वासे मोजणारे काश्मिरी राजकारणी?

सेहगलांच्या “जाहीर माफी”चा कार्यक्रम: अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने आणखी एक नाटक

साहित्य संमेलनात मुखभंग झाल्यानंतर आता खोडसाळांचा नवा कांगावा – सर्व मराठी भाषिकांच्या वतीने ‘माजी’ साहित्यिक व आता निव्वळ राजकारण करणार्‍या नयनतारा सहगल यांची माफी मागणे.
prasanna joshi abp majha sawarkar nayak ki khalnayak apology

अग्रलेख वापसी आणि एबीपी माझाची माफी: दुर्जनांची दमनशाही विरुद्ध सज्जनशक्तीचा विजय

लोकसत्ताची अग्रलेख वापसी आणि हा माफीनामा ह्यात मोठा फरक आहे. लोकसत्तावर दबाव आणणाऱ्या 'शक्तिशाली' लोकांना आपली ओळख लपवावी लागते. चोरुन दबाव आणावा लागतो. हा दबाव कोणी आणला, हे उघडपणे सांगण्याचे किंवा त्या दबावाला बळी न पडण्याचे धैर्य संपादकांनाही नसते. पण एबीपी माझा प्रकरणात याच्या अगदी विरुद्ध घडलं आहे.