बाकी काही नाही तरी भारतीय मतदारांनी अाताच्या सरकारला अाधीपेक्षा मोठे बहुमत देत इथल्या टिंगलखोरांना चोख उत्तर दिले. मोदी-शहा-स्मृती अाणि अाणखीही अनेकजण. यांचा एक शब्दही खाली पडू दिला जात नव्हता. तो वरच्यावर झेलण्याची त्यांच्यात स्पर्धा चालू असे. केल्या जाणार्‍या टिंगलीला अंत नव्हता.

मोदी हे तळागाळातून वर अाले अाहेत. त्यांच्यात डून स्कूलमधून बाहेर पडलेल्यांसारखा भपकेबाजपणाचा अंश नाही. मुख्यमंत्रीपद असो वा पंतप्रधानपद असो, ते कायमसाठी नसल्याची पूर्ण जाणीव असलेला असा तो माणूस अाहे. संघाचे काम करता करता जमेल तसे शिक्षण बहिस्थपद्धतीने घेणार्‍या माणसात तो पॉलिश्डपणा कसा असणार? त्याने ट्रम्पची गळाभेट घेतली तर तो दुसर्‍याच्या गळ्यात पडतो असे म्हणायचे. त्याने काहीही केले तर त्याच्यात खोट काढायची. अगदी योगासने करताना तीन रंगी उपरण्याने (तिरंगा नव्हे) घाम पुसला तर त्यावरून तो तिरंग्याचा अपमान केला अशा कांगाव्याला तुम्ही बळी पडलाच समजा. अाजपर्यंत गांधी घराण्यातले असणे हाच एक निकष पंतप्रधानपदासाठी चालवून घेतलेल्यांना हा ‘गावंढळ’ माणूस तेथे बसलेला चालणे शक्यच नव्हते.

त्यांना जनतेशी संवाद साधायला अावडते. त्यामुळे त्यांनी प्रेश्यांना पूर्णपणे बाजूला सारत स्वत:च विविध मार्गांनी जनतेशी संवाद सांधायला सुरूवात केली. तर ते पत्रकारांना घाबरतात असे तुम्ही समजू लागलात. पत्रकारितेच्या व्यवसायाशी व्यभिचार करणारे सर्वत्र माजलेले असूनही ती बाजू लक्षात न देता त्यांना भित्रे समजायला मात्र तुम्ही तयार.

अाताही त्यांच्या वृद्ध अाईबरोबर त्यांचे फोटो दिसले तर तोदेखील तुम्हाला टिंगल करण्याचा विषय वाटतो. ते केदारनाथाच्या दर्शनाला गेले, तेथे ध्यानाला बसले तर पंतप्रधान म्हणून त्यांचे फोटो सगळीकडे काढले जातात हे लक्षात न घेता जणू ते फोटो काढून घेण्यासाठीच सगळीकडे फिरतात अशी समजुत तुम्ही करून घेणार. फोटो काढण्यावरूनची तुमची स्वत:ची समजुत किती बाळबोध अाहे हे तुम्ही लगेचच दाखवणार. त्यांच्या परदेशवार्‍यांमधील दिवस मोजले तर ते आधीच्या पंतप्रधानांनी परदेशात काढलेल्या दिवसांपेक्षा काही वेगळे नव्हते. अाणि तरीही परदेशवार्‍यांच्या विषयावरून तुम्ही त्यांची टिंगल करण्याची एकही संधी सोडली नाहीत.

बरे, त्यांच्या परदेशवार्‍यांमधून भारताने विविध पातळ्यांवर मिळवलेले यशही तुम्हाला दिसत नाही. परदेशी जाताना येथील पत्रकारांची खातीरदारी करण्याची पूर्वापार चालत अालेली पद्धत त्यांनी मोडीत काढली. त्यावरून चिडलेले प्रेश्या त्यांना लक्ष्य करू पाहतात तर तेही तुम्हाला कळत नाही.

त्यांनी नोटबंदी लागू केली तेव्हा हजारच्या नोटा रद्द करत दोन हजारांच्या नोटा वापरात अाणणे हे विरोधाभासी होतेच, परंतु नोटबंदीमुळे सर्व भारतीय नागरिक त्या स्थितीतही सरकारला शक्य तेवढे फसवत फॉर्मल अर्थव्यवस्थेत अाले याचे महत्त्व काही तुमच्या लक्षात अाले नाही. कदाचित तुम्ही तुमच्याकडील बेहिशोबी रकमेतून त्यादिवशी रात्री सराफाच्या दुकानात खरेदीसाठी रांग लावली असेल. कॅशलेस अर्थव्यवस्थेची सक्ती केली तर त्याविरूद्धही तुम्ही बोंब मारणार अाणि तशी सक्ती न करता त्याचा प्रचार केला तर तो स्वत: न अंगिकारता सरकारवरच गोलपोस्ट हकवल्यावा अारोप करणार. नोटबंदी हा काळ्या धनाच्या निर्मितीवर निर्बंध अाणणारा एक उपाय अाहे हे लक्षात न घेता तुम्ही काळा पैसा थांबला का असा सवंग प्रश्न विचारणार. कोणीही धनिक तसेही कधी बँकेच्या रांगेत उभाच रहात नसतो. मात्र नोटबंदीनंतरच्या बँकांसमोतील रांगांमध्ये कोणी श्रीमंत दिसला का असे राजकारण्यांनी विचारले की तुम्ही त्याला जगेच बळी पडणार. जीएसटीचेही तसेच. याच त्या काहीही न कळणार्‍या गावंढळ माणसाने त्यापूर्वीच्या सरकारला अमलात अाणणे दूरच; पण सहमती घडवून अाणता न अालेला जीएसटी लागू केला तर त्यात सुरूवातीला अडथळे व अडचणी येणारच हे गृहित न धरता तुम्ही इतक्या मोठ्या निर्णयावर सडकून टीका करणार. कोणी त्याला गब्बर सिंग टॅक्स म्हटले तर त्यावरून तसे म्हणणार्‍याला न ऐकवता उलट यांची टवाळी करणार. याने स्वच्छतेचा मंत्र देण्यासाठी हातात झाडू धरला तर जणू काही तुमचा सभोवताल स्वच्छ ठेवणे हीदेखील त्याचीच जबाबदारी असल्याप्रमाणे त्याची टिंगल करण्यात धन्यता मानणार.

म्हटले तसे जनतेशी संवाद साधण्याची त्यांची हातोटी अाहे. ते करताना त्यांच्याकडून चुकाही होतात. कधी खरोखर चूक असते तर कधी सांगण्याच्या तपशीलात चूक असते. परंतु काय प्रसंग अाहे व चुकीचे स्वरूप काय अाहे हे न पाहता तुम्ही त्याला फेकू म्हणू लागता. या बहुतेक चुकांनी काही कोणाचे घोडे मारले जाणार नसते. काही गोष्टी समजून घेण्याची तुमची पात्रता नसते किंवा तेवढा संयम तुमच्याकडे नसतो. तरीही अापला पंतप्रधान कसा अवैज्ञानिक अाहे हे दाखवण्यात तुम्हाला कोण कौतुक वाटते.

त्यांनी चौकीदार हा शब्द वापरला की तुमची समजशक्ती इमारतीच्या रखवालदाराच्या पलीकडे जात नाही. तरीही त्यावरून टिंगल. त्यामुळेच मग कसलीही पात्रता सिद्ध न केलेल्या काँग्रेस पक्षाध्यक्षांनी ‘चौकीदार चोर है’ असा बेछूट अारोप करायला सुरूवात केली की त्यात काडीचेही तथ्य नसूनही तुम्ही अापसूक त्याकडे अाकृष्ट होता.

अलीकडच्या काळात देशाच्या कोणत्याही सरकारने न दाखवलेल परकी मुलखात शिरून कारवाई करण्यावे धाडस या सरकारने दाखवले. परंतु त्यात सरकारचे अगदी निर्णयक्षमतेचेही श्रेय नाही अशी तुमची समजुत. ज्या सरकारने ही कारवाई केली त्याचा पक्षाध्यक्षाकडे काही आतली माहिती असू शकते हे लक्षात न घेता उलट कारवाईचे पुरावे मागण्यापर्यंत तुमची प्रगती झाली.

तर सांगायचा मुद्दा असा की गेली पाच वर्षे तुम्ही देशाच्या पंतप्रधानांची दरवाजातल्या पायपुसण्याचीही इज्जत ठेवलेली नाही. इतके तुम्ही मोदीद्वेषात अाकंठ बुडून गेलात. तरीही हा गावंढळ व अतिसामान्य माणूस त्याला जे करायचे त्या मार्गावर चालतच राहिला. भुंकणार्‍या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करत निश्चयीपणे चाललेल्या हत्तीप्रमाणे. त्याने सुरू केलेल्या विविध जनकल्याण योजनांची यादी तर मी देत बसतच नाही.

तथाकथित गोरक्षकांनी एखाद्याची धर्माच्या अाधारावर हत्या केली तर त्याचे तुम्ही या सरकारला लक्ष्य करण्याशिवाय काहीच केले नाहीत. मग रेल्वेत जागा मिळण्यावरून झालेल्या भांडणातून झालेली हत्यादेखील तुमच्यासाठी धार्मिक हत्या ठरली. याने त्याविरूद्ध दिलेला इशारा तुम्ही विसरून गेलात; मात्र दिल्ली निवडणुकीपूर्वी दोन-चार चर्चवर दगड मारवून ‘अल्पसंख्यांक या देशात सुरक्षित नसल्याच्या’ कांगाव्याला तुम्ही सहज बळी पडलात.

तेव्हा म्हटले तसे त्याच्या हातून खरेच म्हणाव्या अशा चुका निश्चित झाल्या. मात्र म्हटले तसे त्यांचे गांभीर्य किती हे समजण्यात तुम्ही कमी पडलात. अाता त्याच्याशी संपर्क साधण्याचे कितीतरी इतर मार्ग उपलब्ध असूनदेखील तुम्ही त्याची टिंगल करण्याखेरीज इतर काहीच केले नाहीत. उलट तुम्ही तसे न करता दुष्प्रचार हेच ध्येय असलेल्या नियतकालिकांना किंवा टीव्हीचॅनल्सना तुम्ही तुमच्या माहितीचा स्रोत बनवता. मग देशाला खड्ड्यात घालणार्‍या शहरी नक्षल्यांना कोणी कार्यक्रमाला बोलावले तरीही त्यात तुम्हाला काहीच वावगे वाटेनासे होते. अशा अाणखी कितीतरी गोष्टी सांगता येतील. पण तुम्ही स्वत:चे काय करून घेतले अाहे हे सांगण्यासाठी त्यांची गरज नाही.

गेली पाच वर्षे तुम्हाला या तुमच्या लेखी गावंढळ असलेल्या माणसाला या ना त्या स्वरूपात लक्ष्य करण्यातच गेली. पण म्हटले तसे याला त्यामुळे म्हणजे तुमच्या टवाळकीने काडीचाही फरक पडलेला नाही. हे तुमच्या लक्षात अाले असेल तर एका प्रकारे याने तुम्हाला तुमची जागाच दाखवली अाहे हे तुम्हाला कळले असेल. अाता पुढची पाच वर्षे तुम्हाला अातासारखीच घालवायची तर जरूर घालवा. याला किंवा कोणालाच काही फरक पडत नाही.

शुभेच्छा. पुढच्या पाच वर्षांमधील वर्तनासाठी.

लेखांच्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा : फेसबुक / ट्विटर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here