devendra fadnavis narendra modi bjp rationalperusal

मराठी माणसाच्या हक्कांचे स्वयंघोषित चॅम्पियन असलेले पक्ष भाजप सरकारवर गुजराती आणि उत्तर भारतीयांचा पक्षपाती असल्याचा आरोप करत असतात. याच्या जो़डीला हा राष्ट्रीय पक्ष मराठीच्या मुद्द्याकडे दूर्लक्ष करतो, किंवा त्यांना मराठी माणसाचे काही पडलेले नाही असा आरोपही हे प्रादेशिक पक्ष करत असतात. पण वास्तविक पाहता, मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी जेवढी कामं भाजप सरकारने जेवढी कामे केली आहेत तेवढी कामं याआधीच्या कुठल्याही सरकारच्या काळात झाली नव्हती.

त्यामुळेच त्या कामांचा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.

ही आहे या सरकारने केलेल्या कामांची यादी :

· मराठी विश्वकोश खंड – २० पूर्वार्ध चे प्रकाशन (जानेवारी २०१५)

· मराठी भाषा विकास धोरणाच्या निर्मितीत लोकसहभाग (फेब्रुवारी २०१५ )

· अकृषी विद्यापीठांमध्ये भाषा धोरणाच्या अनुषंगाने चर्चासत्रांचे यशस्वी आयोजन

· मराठी ज्ञानपीठ विजेत्यांचा गौरव (७ मे, २०१५ )

· मराठी ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा – कायदेमंडळाची मान्यता. (जुलै२०१५)

· दि.१५ ऑक्टोबर, २०१५ रोजी “पुष्पगुच्छ नव्हे पुस्तक (बुके नव्हे बुक)” असा शासन निर्णय जाहीर

· सन २०१५ या वर्षात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची सुमारे ३५ पुस्तके प्रकाशित

· अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीचे २५ लाख रुपयांचे अनुदान दरवर्षी विजयादशमीपूर्वीच साहित्य महामंडळाच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय.

नोव्हेंबर, २०१५ ते डिसेंबर, २०१६

· मंत्रालयात विक्रमी ग्रंथविक्री (जानेवारी २०१६ )

· मराठी साहित्य विक्री करण्यासाठी अल्पदरात गाळे उपलब्ध करुन देण्याबाबतचा शासन निर्णय. (जानेवारी २०१६ )

· विश्वकोशांच्या अद्ययावतीकरणासाठी ज्ञानमंडळे स्थापन. (फेब्रुवारी २०१६ )

· डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार व मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार दोन नवे पुरस्कार. (फेब्रुवारी २०१६ )

· प्रकाशनांवर 40% सवलत व अधिकृत वितरकांद्वारे विक्री (मार्च २०१६ )

· मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये (बहुचित्रपटगृहांमध्ये) मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळण्यासाठी यशस्वी पाठपुरावा (मार्च 2016)

· राज्य व केंद्र शासनाचे मराठी अनुवादीत 586 राज्य अधिनियम तसेच 166 केंद्रीय अधिनियम अधिनियम संकेतस्थळावर उपलब्ध.

· महाराष्ट्र राज्य आता युनिकोड कन्सॉर्शियमचे वार्षिक सदस्य (जुलै 2016)

· इस्रायलमधील तेल-अवीव विद्यापीठामध्ये मराठीचे प्रशिक्षण वर्ग (जुलै २०१६)

· मध्य व पश्चिम रेल्वेच्या १०० अमराठी अधिकारी व कर्मचारी यांना मराठी भाषा शिकविण्याच्या प्रकल्प.

· डेक्कन महाविद्यालयातील तज्ज्ञांच्या सहकार्याने बोली भाषांचे जतन

· वस्त्रनिर्मिती माहिती कोशाचे ४ खंड प्रसिध्द करण्यात आले आहेत.

· तंजावर येथील ५ लक्ष मोडी कागदपत्रांच्या डिजिटलायझेशनचे काम पूर्ण.

· वाराणसी (बनारस) येथील मराठी भाषिकांचे सर्वेक्षण करुन भाषिक नमुने गोळा.

· मराठीतील, १८२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीतील शब्दांचा साठा असलेला दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश व सूची प्रसिध्द करण्यात आली आहे.

· देश व परदेशातील १२२ मराठी मंडळांची माहिती संकलित करण्यात आली आहे.

जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७

· युनिकोड मराठी संगणकावर कार्यान्वित करण्याविषयीच्या माहितीपटाची निर्मिती व सदर माहितीपट महाराष्ट्र शासनाच्या मुख्य संकेतस्थळावर प्रदर्शित.

· पेनड्राईव्हमध्ये विश्वकोश या योजनेचा प्रारंभ. विश्वकोशाचे खंड २० पेनड्राईव्हच्या माध्यमातून लोकांना सशुल्क उपलब्ध.

· पुस्तकांच्या गावाचे लोकार्पण – दि. ४ मे, २०१७

· महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे ७ मुख्य साहित्य संस्थांना सन २०१८ पासून रुपये ५ लाखांऐवजी रुपये १० लाख एवढे अनुदान देण्याचा निर्णय.

· केंद्र शासनाच्या “श्रेष्ठ भारत, एक भारत” या योजनेअंतर्गत ओरिसा राज्यासोबत भाषिक व सांस्कृतिक देवाणघेवाण. ५ निवडक मराठी पुस्तकांचा उरिया भाषेत अनुवाद पूर्ण. (छपाई- ओरिसा शासन).

· महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाकडून निवडक शाहीर अमर शेख या पुस्तकाचे संपादन पूर्ण झाले असून सदर पुस्तक छपाईसाठी शासकीय मुद्रणालयास सोपविण्यात आले आहे.

जानेवारी 2018 ते अद्यापपर्यंत

· महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषक विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी विशेष बाब म्हणून ईबीसी सवलत. योजनेचा शासन निर्णय जाहीर. (जानेवारी, २०१८)

· दि. १२ जानेवारी २०१८ रोजी मराठी विश्वकोशाच्या मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले.

· मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालयाच्या शासन शब्दकोश या उपयोजकाचे (ॲपचे) लोकार्पण (फेब्रुवारी,२०१८)

· मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या १८ पुस्तकांचे प्रकाशन (फेब्रुवारी,२०१८)

· पुस्तकांचे गाव भिलार येथे खुल्या प्रेक्षागृहाचे लोकार्पण (मे, २०१८)

· पुस्तकांचे गाव भिलार येथे नव्या 5 दालनांचे लोकार्पण (मे, २०१८ )

· राज्य मराठी विकास संस्थेतर्फे मराठी भाषा व साहित्याच्या क्षेत्रांत संशोधन करणाऱ्या 14 संस्थांना कमाल 5लाखपर्यंत अनुदान. (मे, २०१८ )

· मध्य रेल्वेच्या मुंबई-मनमाड-मंबई पंचवटी एक्सप्रेस व मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन यांमध्ये विनामूल्य फिरते ग्रंथालय व वाचनदूत सेवेचा प्रारंभ (१५ऑक्टोबर, २०१८)

· बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषा व साहित्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना अनुदान

२०१६-१७ ११ मंडळं, रु.१५ लक्ष ७४ हजार/-

२०१७-१८ ८ मंडळं रु.१० लक्ष ४६ हजार/-

२०१८-१९ ३३ मंडळं रु. ४६ लक्ष ८१ हजार/-

रंगवैखरी नाट्याविष्कार स्पर्धा-

पहिले वर्ष २०१८, २४ संघ, रु. ८ लक्ष ४० हजार /-

दुसरे वर्ष २०१९, ३८ संघ, रु. ८ लक्ष ४० हजार /-

मराठी भाषा विभागाचे अस्तित्व ठळक करणारे कार्यक्रम

मराठी भाषा गौरव दिन (दि. 27 फेब्रुवारी) अभूतपूर्व पद्धतीने साजरा होतोय. गेल्या दोन वर्षांपासून हा उत्सव साजरा होत आहे.

 • हजारो शाळा, शेकडो महाविद्यालये आणि ग्रंथालये व सांस्कृतिक संस्था उत्साहाने व गांभीर्यासह सहभागी.
 • शेकडो महाविद्यालयांत वैविध्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण कार्यक्रम संपन्न.
 • सन २०१६ च्या मराठी भाषा दिनी भाषेची स्थित्यंतरे उलगडणारा मराठीनामा हा अनोखा कार्यक्रम सादर.
 • २०१६ पासून दोन नव्या पुरस्कारांचा प्रारंभ (केळकर व पाडगांवकर)

वाचन प्रेरणा दिवस (दि. १५ ऑक्टोबर, २०१५ रोजी सुरुवात)

 • डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन.
 • शाळा, महाविद्यालये, सामाजिक व सांस्कृतिक संस्था यांमध्ये साजरा होतो.
 • गेल्या दोन वर्षात या उपक्रमाचे रूपांतर “चळवळीत” झाले आहे.
 • दि.१५ ऑक्टोबर,२०१५ रोजी पुष्पगुच्छ नव्हे पुस्तक (बुके नव्हे बुक) असा शासन निर्णय जाहीर.
 • सन २०१६ च्या वाचन प्रेरणा दिवशी कुसुमग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी या योजनेंतर्गत एकूण १३ जिल्ह्यातील २१ अंधशाळांना प्रत्येकी १०० अशी २१०० बोलकी पुस्तके प्रदान.
 • मुंबईतील २५ वाचनप्रेमी गटांना १०० पुस्तकांची एक पेटी अशी २५०० पुस्तके प्रदान.
 • सुमारे १०० महाविद्यालयांत साहित्यिक, कलाकार व सुप्रसिद्ध व्यक्ती यांचा संवाद.

या सगळ्या कार्यक्रमांची आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची यादी बघितल्यास या सरकारच्या काळात मराठी भाषा विभाग खुपच सक्रीय झाला असल्याचे लक्षात येते. त्यामुळे हे सरकार मराठी भाषा संस्कृती याच्याबाबत उदासीन असल्याचा आरोप निव्वळ राजकीय आहे असे म्हणावे लागते.

लेखांच्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा : फेसबुक / ट्विटर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here